काळजी पुन्हा वाढली; कोरोना बाधितांची आजची संख्या १०३०

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार १०३ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. आज दिवसभरात २० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे

जळगाव शहर-२१२, जळगाव ग्रामीण-५९, भुसावळ-१३०, अमळनेर-१०५, चोपडा-८७, पाचोरा-७९, भडगाव-१०, धरणगाव-५३, यावल-३०, एरंडोल-४९, जामनेर-१९, रावेर-८४, पारोळा -२७, चाळीसगाव-३७, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील २० असे एकुण १ हजार ३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ७ हजार १०३ बाधित रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी ९३ हजार ९७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार २३९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातून २० बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

 

Protected Content