
सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र भारताला एकसंध करणारे महान नेतृत्व भारतरत्न लेवा समाज भुषण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी यांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर, ग्रामपंचायत सदस्य कालू मिस्तरी, योगिराज किसन महाजन, संजय काशिनाथ माळी, हर्षल दिलीप पाटील, विशाल पाटील पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुख्य लिपिक प्रकाश वायके, पंकज मालखेडे पाणी पुरवठा कर्मचारी सुनिल पाटील, अजय कराड, संगणक परिचालक आदी उपस्थित होते.


