फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदरील स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी व उद्घाटक सावदा येथील डॉ. विलास पाटील हे उपस्थितीत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. विलास बोरोले, जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. डॉ. सतीश चौधरीसर, प्रा. डॉ. बेलोरकर, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा.डॉ. महेश पाटील, प्रा.डॉ. पी.आर. चौधरी, प्रा. उमेश पाटील, प्रा. आहिरराव, प्रा.डॉ. प्रसाद भोगे, प्रा. सचिन पाटील अमळनेर इत्यादी उपस्थितीत होते. निवड समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ.पी. आर. चौधरी व प्रा. जे. बी. सिसोदीया यांनी कार्य केले.
विद्यापीठाच्या आंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत पुरूष आणि महिला प्रकारात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि एरंडोल यांनी सहभाग घेतला होता. पंच म्हणून ठाणे, अमरावती, बिड व जळगाव जिल्ह्यातील तायक्वंडो पंचांनी कार्य केले. यात जळगाव संघटनेचे सचिव आजित घारगे, प्रमोद कदम (ठाणे), सुमनय कंक (ठाणे), बलवंत बोबडे (अमरावती), अमर कांबळे (अमरावती), जयेश बाविस्कर (जळगाव), गिरीश खोडके, अमोल जाधव, जीवन महाजन, प्रदीप जलंकर, राहुल पाटील आणि स्नेहल अट्रावलकर यांनी कार्य केले.
तायक्वांदोच्या विभागीय स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- पुरूष गटात जळगाव विभाग विजयी, धुळे विभाग उपविजयी तर एरंडोल विभाग तृतीय स्थानी राहिले. महिला गटात जळगाव विभाग विजयी, तर धुळे व नंदुरबार विभाग संयुक्तिक पणे उपविजेतेपद प्राप्त केले. धनाजी नाना महाविद्यालयातील खेळाडू पुष्पक महाजन यांनी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुढील वर्षी ज्यास्तीत ज्यास्त खेळाडूंनी सत्कार करण्याची संधी द्यावी असे अव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरीसर यांनी केले.
स्पर्धेच्या उद्घाटन भाषणात डॉ. विलास पाटील यांनी सांगितले की, तायक्वांदो हा खेळ स्वसंरक्षणार्थ खेळला जाणारा क्रीडा प्रकार आहे. मनुष्य जीवनात सहज प्रवृत्तीच्या हालचालींना माध्यमातून खेळला जातो आणि त्या खेळातून सर्वांगीण विकास होतो. त्यासोबत उच्च कोटीचा आनंद मिळतो व त्यातुन सुखी व आनंदी जीवन जगता येते. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात खेळत राहिले पाहिजे. खास करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी खेळाकडे एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे व त्या उद्देशानेच खेळात सहभाग घेतला पाहिजे असे सांगितले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरीसर यांनी तरूणानी खेळ हे करिअरचे उत्तम साधन आहे व महाविद्यालयातील खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून आणेकांना नौकरी मिळाल्याचे उदाहरण देऊन सांगितले. स्पर्धा परिक्षेत खेळाला असलेले महत्व त्यांनी सांगितले. त्या सोबतच सर्व तरूणानी स्वातंत्र्याची आठवण ठेवली पाहिजे आणि हे महाविद्यालय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वाचे ठिकाण आहे आणि थोर स्वातंत्र्य सेनानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमित आल्या नंतर सर्वानी प्रेरणास्तंभाला भेट द्यावी असे अव्हान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीमखाना समितीचे चेअरमन प्रा. डाॅ. सतीश चौधरी सर यांनी केले. डॉ. सतीश सर यांनी तायक्वांडो खेळात लागणारी चपळता, लवचिकता, आणि स्फूर्ती यांचा अंगीकार खेळाडूने केल्यास तो खेळाडू नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. त्या सोबत या वर्षी आयोजित स्पर्धा ह्या विद्याठाच्या इतिहासात पहिल्यांदाच डिजीटल स्कोर बोर्डावर खेळल्या जात असल्या मुळे एका निकोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे निकोप व निष्पक्ष अशा स्पर्धा आयोजित होतील असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले व अभार प्रा. पल्लवी भंगाळे मॅडम यांनी मानले. स्पर्धा यशस्वी संपन्न करण्याकरिता प्रा. डाॅ. सतीश चौधरीसर, प्रा. डॉ. गोविंद मारतळे, प्रा. वंदना बोरोलो मॅडम, प्रा. डाॅ. पल्लवी भंगाळे, प्रा. शिवाजी मगर, प्रा. नाहीदा कुरेशी मॅडम, प्रा. तिलोत्तमा चौधरी मॅडम, प्रा. आर्चना वराडे मॅडम व राजेंद्र ठाकुर यांनी परिश्रम घेतले.