धक्कादायक : बीसीसीआयने गेल्या १० महिन्यांपासून खेळाडूंना दिले नाही मानधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयने गेल्या १० महिन्यांपासून करारबद्ध असलेल्या २७ खेळाडूंना मानधन दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या २७ खेळाडूंना गेल्या ऑक्टोबरपासून पगार आणि सामना शुल्क मिळालेले नाही. बीसीसीआय त्यांच्याशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना त्यांच्या श्रेणीनुसार वर्षातून चार वेळा (तिमाही पद्धतीने) पगार देते. मात्र गेल्या १० महिन्यांपासून खेळाडूंना पगार मिळालेला नाही. भारताचे २७ खेळाडू बीसीसीआयच्या विविध करारश्रेणीत मोडले जातात. या सर्व खेळाडूंना गेल्या ऑक्टोबरपासून त्यांचं मानधनच मिळालेले नाही. इतकेच नव्हे तर डिसेंबर २०१९ पासून भारतीय संघाने खेळलेल्या दोन कसोटी, ९ वन-डे आणि ८ टी-२० सामन्यांची मॅच फी ही बीसीसीआयने अद्याप दिलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर येते आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या अखेरच्या ताळेबंदात बँक खात्यात जमा असलेल्या रकमेची माहिती दिली होती. मार्च २०१८ रोजी बीसीसीआयच्या बँक खात्यात एकूण ५ हजार ५२६ कोटी रुपये होते.

Protected Content