धक्कादायक : पुण्यातील १७ नर्स, ३ डॉक्टरांना करोनाची लागण

पुणे वृत्तसंस्था । कोरोनाचे रूग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढत असून शहरातील रुबी हॉल क्लिनिकमधील १७ परिचारिका, तीन डॉक्टर, वॉर्डबॉय यांच्यासह तब्बल २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आलं आहे. रुग्णालयाचे सीईओ बोमी भोट यांनी ही माहिती दिली.

 

कोरोना : पंढरपूर उद्यापासून तीन लॉकडाऊन

रुबी हॉल क्लीनिकमधील १ हजार जणांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल नुकताच आला. त्यातून २५ जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने आरोग्य सेवकांना होत असलेल्या संसर्गामुळं चिंतेचं वातावरण आहे.

पालघरप्रकरण सीबीआयकडे सोपवा- संत समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यातही पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आतापर्यंत ७५६ वर पोहोचली आहे. त्यात पुणे शहरातील ६४७, पिंपरी चिंचवड ५८, पुणे ग्रामीण २४ आणि पुणे कँटोन्मेंट- जिल्हा रुग्णालय २७ जणांचा समावेश आहे.

संचारबंदी : यावल येथे पोलीस प्रशासनाच्या मदतीला माजी सैनिक सरसावले

जिल्ह्यात काल एका दिवसात ८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात पुणे शहरातील ८५ तर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाचा समावेश होता. आतापर्यंत १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

Protected Content