धक्कादायक : तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थींनी गंभीर जखमी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थींनी ही शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने कंबरेला व पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

टिना सतिश तुळसकर असे जखमी झालेल्या विद्यार्थींनीचे नाव आहे. तिसऱ्या मजल्यावरून अचानक कशी पडला असा प्रश्न निर्माण होत आहे. टिना सतिश तुळसकर ही न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या इयत्ता नववी तुकडी आय मध्ये शिकत आहे. वर्गातील शेवटचा तास ११.३० वाजेच्या सुमारास होता. त्यामुळे शिक्षण येण्याच्या आगोदर वर्गासमोर असलेल्या गॅलरीत उभे होते. त्यावेळी टिना तुळसकर ही विद्यार्थींनी देखील उभी होती. अचानक तिचा तोल जावून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. ही घटना घडल्यानंतर शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी धाव घेतली. तिला तिच्या पालकांच्या मदतीने खागसी रूग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणी केल्यानंतर तिच्या कंबरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

Protected Content