धक्कादायक : एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या !

म्हापसा (वृत्तसंस्था) कर्जबारी झाल्यामुळे खोर्ली-म्हापसा येथील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली आहे.

 

शाहू धुमाळे (४१), कविता धुमाळे (३४), पारस धुमाळे (९) व साईराज धुमाळे (अडीच वर्षे) असे मयतांची नावे आहेत. मूळ नेसरी-गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील कुटुंबीय काही वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास होते. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलीस घरात शिरल्यावर शाहू धुमाळे यांचा मृतदेह हा फ्लॅटमधील हॉलमध्ये पंख्याला लटकलेला सापडला. तर पत्नी कविता व दोन्ही मुलांचा मृतदेह बेडरूममध्ये कॉटवर आढळले. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट सापडल्याची पोलिसांनी पत्रकारांना दिली.

Protected Content