सातपुड्याच्या पायथ्याशी आजपासून भोंगरा बाजाराला सुरूवात; पारंपारिक संस्कृतीचे होणार दर्शन

चोपडा प्रतिनिधी । सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या-वस्त्यांवर आजपासून पासून होणाऱ्या भोंगऱ्या बाजाराने सध्या आनंदाचे उधान आले आहे. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून ढोल व आदिवासी वाद्याचा आवाज घुमू लागला आहे. या भोंगऱ्या बाजारांतून पारंपारीक ठेवा असलेल्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन या उत्सवातू होणार आहे. त्याची जोरदार तयारी सर्वत्र पुर्णत्वास आली आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी मध्य प्रदेशच्या बऱ्हानपुर पासुन ते गुजरातच्या हद्दीपर्यंत अगदी गाववाड्या वस्त्यांवर आदिवाशी पावरा समाज मोठ्या प्रमाणावर विखुरलेला आहे. या समाजात होळी या सणास अन्यसाधारण महत्व आहे. होळी सणाच्या आधी या उत्सवाचे महत्व ठरणाऱ्या भोंगऱ्या बाजाराची सुरवात मंगळवार सुरूवात झाली. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बहुतांशी आदिवासी समाजाचा शेती व मजुरी हा मुळ व्यवसाय आहे. गरिबीत जगणारा हा समाज आजही अठरा विश्व दारिद्र्याचा सामणा करून कष्टाळु म्हणुन ओळखला जातो. मात्र आजही हा समाज आपले सण उत्सव अगदी पारंपारीक पध्दतीने साजरा करून आपली आगळी-वेगळी स्वस्कृतीचे जतन करत असल्याचे या सणातून दिसुन येते.

या समाजात दिवाळी पेक्षाही महत्वाचा असलेला होळी हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. होळीच्या आठ दिवस आधी त्या त्या गाव व परिसराच्या बाजाराला “गुलाल्या हाट” म्हणुन साजरा करतात. रोजगारासाठी बाहेर गेलेले समाज बांधव या सणासाठी आपल्या मुळ गावी येत असतात. या बाजारात येणारे सर्व नातेवाईक सगसोयरे मित्र परिवार एकेकांना गुलाल लावुन आपआपल्या गावात आयोजीत केलेल्या भोंगऱ्या बाजारात येण्याचे आमंत्रण देतात.तर नंतर होळीच्या आठ दिवस आधी दररोज परिसरातील मध्यभागी असलेल्या गावांना किंवा आढवडे बाजाराच्या ठिकाणी हा भोंगऱ्या बाजार भरत असतो.

यावर्षी ३ मार्च मंळवारी वरगव्हान, झामटी, किनगांव व मेलाणे, ४ बुधवारी धवली, शेवरे व शिरवेल, ५ गुरूवारी धानोरा, बलवाडी, ६ शुक्रवारी यावल, वरला, नालबंद, ७ शनिवार वैजापुर व वाघझिरा, ८ रविवार रोजी कुंड्यापाणी, कर्जाना व ९ सोमवार रोजी अडावद व चिरमिल्या येथे बाजार भरणार आहेत. तर होळीचे दिवशी गावागावत सामुहीक होळी जाळली जाणार आहे. या बाजारात आदिवासी बांधव आपल्या पारंपारीक पध्दतीने नटुन थटून बैलगाडीने बाजारात हजर होऊन आपआपल्या ढोल ताशांसह स्री-पुरूष, तरूण-तरूणी अबालवृध्द रंगबेरंगी आर्कषक असा पेहराव करत बेधुंद सामुहिक नृत्य करून आपला आनंद साजरा करतात.

हार, कंगन, खजुर व फुटान्यांचा प्रसाद एकमेकांना देत असतात. उत्कृष्ठ ढोल वाजवण्याची स्पर्धाही यावेळी लागतात. आदिवासी भाषेत गाणे म्हणुन एकमेकांचा उत्साह वाढवला जातो.एकुणच पिढ्यांनपिढ्या पासुनची आदिवासी संस्कृतीचे जतन करत तिचे दर्शन करून देणारा भोंगऱ्या बाजार या समाजासाठी अन्यसाधरण असा सण असुन त्यासाठी काबाड कष्ट करून पै-पै जमवलेला पैसा आदिवासी बांधव या उत्सवावर खर्च करतात.

चांदी व गुर-ढोरांच्या बाजारात होते मोठी ऊलाढाल
या समाजासाठी महत्वाची मानली जाणारी संपत्ती म्हणजे चांदी आणि गुरे ढोरे या काळात पैशांच्या गरजेसाठी हेच गुरे ढोरे व जमा थोडी थोडी जमा करून ठेवलेली चांदी यांची मोढ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असते म्हणुन या भागात असलेल्या बाजारांमध्ये याची मोठी ऊलाढाल होत असुन गुरे खरेदीसाठी दुरदुरवरील व्यापारी येथे हजेरी लावत असतात.

महिनाभर पाळले जातात नियम
पावरा समाजात या महिनाभरासाठी अनेक नियम काटेकोरपणे पाळले जातात सर्व समाज या काळात कोणतेही लग्नकार्य गंधमुक्ती कार्य नविनघर बांधण्याचे काम करत नाहीत. समाजातील मुख्य व्यक्ती उपवास करतात या काळात रहिवाशी किंवा झोपडीचे नविन काम केले जात नाही. आदी नियमाचे पालन अगदी चोख पालन केले जाते. अशी माहिती कुंड्यापाणीचे माजी उपसरपंच दिलदार पावरा यांनी बोलताना माहिती दिली.

Protected Content