देशातील कोणत्याही शाखेत एलआयसी पॉलिसी मॅच्युरिटी क्लेम पेमेंटसाठी कागदपत्रे द्या

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  आता ग्राहक देशातील कोणत्याही एलआयसी शाखेत एलआयसी पॉलिसी मॅच्युरिटी क्लेम पेमेंटसाठी कागदपत्रे सादर करु शकतात. कोरोनाच्या संकटामुळे प्रवास करणं धोक्याचं आहे. आता जवळच्या कुठल्याही शाखेमध्ये कागदपत्रं देता येणार आहे

 

देशातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे..

 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेत कागदपत्रं जमा केली तरी मॅच्युरिटी क्लेमवर फक्त मूळ शाखेतून प्रक्रिया केली जाईल. एलआयसीने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. एलआयसीने म्हटले आहे की, पॉलिसीधारक महिन्याच्या अखेरीस देशातील जवळच्या कोणत्याही एलआयसी कार्यालयात  पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा दावा करण्यासाठी कागदपत्रे सादर करु शकतात. एलआयसीच्या या घोषणेनंतर ज्या पॉलिसीधारकांचे दावे  परिपक्व झाले आहे अशा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळेल.

 

 

एलआयसीची देशभरात 113 विभागीय कार्यालये, 2,048 शाखा आणि 1,526 छोटी कार्यालये आहेत.  यामध्ये 74 ग्राहक झोन आहेत. जिथे त्यांच्या पॉलिसीचे मॅच्युरिटी क्लेम फॉर्म पॉलिसीधारकांकडून स्वीकारले जातील. कोणत्याही शाखेतून घेतलेल्या पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर ग्राहक क्लेम फॉर्म कुठेही सबमिट करू शकतील.

 

एलआयसीचे म्हणणे आहे की, ही सुविधा चाचणी म्हणून सुरू केली गेली आहे आणि त्वरित अंमलात आली आहे. ही सुविधा 31 मार्च रोजी कालबाह्य होत आहे. एलआयसीमध्ये सध्या 29 कोटींपेक्षा जास्त पॉलिसीधारक आहेत. विमा व्यवसायात एलआयसी ही प्रथम क्रमांकावर विश्वासार्ह कंपनी आहे. लोकांना विश्वास आहे की, एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेले त्यांचे पैसे कधीही गमावणार नाहीत.

 

एलआयसी ही फक्त एक विश्वासार्ह विमा कंपनी नाही तर सर्वसामान्यांसाठी रोजगाराचा पर्यायदेखील आहे. अलीकडेच कंपनीने आपले नवीन पॉलिसी बचत प्लस बाजारात आणले. यात सुरक्षेसह बचत करण्याचीही सुविधा आहे. या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी पाच वर्षांचा आहे.

Protected Content