कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना प्रतिबंधक उपयायोजना (व्हिडिओ)

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी गुरेढोरे बाजारांवर बंदी घातलेली आहे. अशात चाळीसगाव उत्पन्न बाजार समिती मार्फत कोरोना प्रतिबंधक म्हणून कोणकोणते उपाययोजना राबविण्यात येत आहे. हे जाणून घेण्यासाठी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांच्याशी आज लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने  संवाद साधला. 

शहरात कोरोना रूग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे. तर ह्या नियमांचे पालन चाळीसगाव उत्पन्न बाजार समिती येथे होत आहे का? हे जाणून घेण्यासाठी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांच्याशी आज चर्चा करण्यात आली. दरम्यान गुरेढोरेचा बाजार बंद असून भाजीपाला मार्केटात नियमांचे पालन करत भरवले जात असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच गुरेढोरे बाजार भरवली जाणार का? यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी बोलून सोशल सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बाजार भरवला जावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिनेश पाटील यांनी असेही सांगितले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/773145549985491

 

Protected Content