अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील देवगाव येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे पूज्य साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली.
पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. पूज्य सानेगुरुजी यांची “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” हा संदेश संपूर्ण देशाला दिला. साने गुरुजींचे विचार तरुण पिढीला प्रेरणादायी आहेत असे कार्यक्रमात मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले. यावेळी इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता सादर केली. सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी शाळेचे क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के, स्काउट शिक्षक एच. ओ. माळी, सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर. महाजन व शिक्षकेतर कर्मचारी एन. जी. देशमुख, गुरूदास पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.