भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील छबीलदास मार्केटमधील ममता क्रिएशन शॉपमधून मोबाईल आणि गल्ल्यात ठेवलेली रोकड असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी बुधवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील छबीलदास मार्केट येथे ममता क्रिएशन शॉप नावचे दुकान आहे. बुधवारी ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनीटांनी अज्ञात दोन महिला दुकानात आल्या. त्यांनी हातचालाखी करून दुकानाचा ७ हजाराचा मोबाईल आणि गल्ल्यातील १५ हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकानदार यांनी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता अज्ञात दोन महिलांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक तुषार इंगळे करीत आहे.