शार्ट सर्कीटमुळे आग : मिरची कांडप कारखाना खाक

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मलकापूर रोडवरील मिरची कांडप कारखान्याला रात्री लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, बोदवड शहरातील मलकापूर रोडवरील खंडेलवाल पेट्रोल पंपामागील देवराम कडू माळी यांच्या मालकीचा मिरची कांडप कारखाना आहे. देवराम माळी यांच्या मुलाला शनिवारी हळद लागल्याने कारखाना बंद होता. दरम्यान काल रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या कारखान्याला अचानक आग लागली. आगीने काही रौद्र रुप धारण केले. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या रहिवाशांनी टँकरद्वारे पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरीही उपयोग न झाल्याने जामनेर, भुसावळ, वरणगाव पालिकेचे अग्निशमन बंब बोलावण्यात आले. रात्री उशीरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही. तथापि, शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून यात सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग तीव्र गतीने पसरल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content