युवारंग महोत्सवात एमजे कॉलेजची सरशी

शहादा-प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवात जळगाव येथील मु.जे. महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले असून चोपडा येथील महाविद्यालयास उपविजेतेपद मिळाले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपड्याचा संघ उपविजेता ठरला. एकूण पाच कला प्रकारांपैकी चार प्रकारात प्रथम आणि एकामध्ये विभागून विजेतेपद मिळवून स्पर्धकांनी विविध कला प्रकारांमध्ये १२ सुवर्ण पदक, ३ रौप्य पदक तर २ कांस्य पदक मिळवले.

दरम्यान, शनिवारी मुजे महाविद्यालयाच्या चमूला विजेतेपदाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. य कार्यक्रमाला प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, पू.सा.गु.वि.प्र. मंडळाचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील, प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर, विधान परिषद सदस्य आमदार सुधीर तांबे, पू.सा.गु.वि.प्र. मंडळाच्या मानद सचिव कमलताई पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. किशोर पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, प्रा. मोहन पावरा, पू.सा.गु.वि.प्र. मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार, युवारंग समन्वयक प्रा. डॉ. आय.जे. पाटील, प्रा. इंदिरा पाटील, प्रा. मकरंद पाटील, रासेयोचे संचालक डॉ. सचिन नांद्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

असा आहे युवारंग स्पर्धेचा निकाल

सर्वसाधारण विजेतेपद
प्रथम – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (डॉ. जी.डी.बेंडाळे स्मृती चषक) द्वितीय – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी स्मृती चषक)

उर्वरित स्पर्धांचा निकाल खालीलप्रकाणे आहे

संगीत विभाग

शास्त्रीय गायन – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), कला व मानव्यशास्त्र प्रशाळा कबचौ उमवि, जळगाव (तृतीय)
शास्त्रीयवादन (तालवाद्य) – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), किसान महाविद्यालय, पारोळा (तृतीय)
शास्त्रीयवादन (सूरवाद्य) – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मू.जे. महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), एसएसव्हीपीएसचे कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे (तृतीय)
सुगम गायन (भारतीय) – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
सुगम गायन (पाश्चिमात्य) – पी.के. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ (प्रथम), फार्मसी महाविद्यालय, शहादा (द्वितीय), जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट, जळगाव (तृतीय)
समूहगीत (भारतीय) – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), मू.जे. महाविद्यालय, जळगाव (तृतीय)
समूहगीत (पाश्चिमात्य) – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
लोकसंगीत – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
भारतीय लोकगीत – पू.सा.गु.वि.प्र. मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)

नृत्य विभाग

समूह लोकनृत्य – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), पी.के. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
शास्त्रीय नृत्य – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), सामाजिकशास्त्रे प्रशाळा कबचौ उमवि, जळगाव (द्वितीय), पू.सा.गु.वि.प्र. मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (तृतीय)
साहित्य कला

वक्तृत्व – एच.आर. पटेल महिला महाविद्यालय, शिरपूर (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे (तृतीय)
वादविवाद – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), सामाजिकशास्त्रे प्रशाळा, कबचौ उमवि, जळगाव (द्वितीय), आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (तृतीय)
काव्यवाचन – एस.एस.व्ही.पी. एसचे कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे (प्रथम), आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (द्वितीय), गोदावरी गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर (तृतीय)

नाट्य कला

विडंबननाट्य – प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मू.जे. महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)
मूकनाट्य – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मू.जे. महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
मिमिक्री – पू.सा.गु.वि.प्र. मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (प्रथम), जी.टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार (द्वितीय), कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धरणगाव (तृतीय)

ललित कला

रांगोळी – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (द्वितीय), वसंतराव नाईक महाविद्यालय, शहादा (तृतीय)
व्यंगचित्र – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी (द्वितीय), मू. जे. महाविद्यालय, जळगाव (तृतीय)
कोलाज – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मू.जे. महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), एच.आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (तृतीय)
क्ले मॉडेलिंग – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (तृतीय)
स्पॉट पेंटिंग – किसान महाविद्यालय, पारोळा (प्रथम), रासायनिकशास्त्र प्रशाळा, कबचौ उमवि, जळगाव (द्वितीय), मू.जे. महाविद्यालय,जळगाव (तृतीय)
चित्रकला – आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर (प्रथम), किसान महाविद्यालय, पारोळा (द्वितीय), पी. के. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ (तृतीय) इन्स्टॉलेशन – मू.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), पू.सा.गु.वि.प्र. मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (द्वितीय), गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी (तृतीय)
फोटोग्राफी – प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), अण्णासाहेब देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी (द्वितीय), एन. टी. व्ही. एस. शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार (तृतीय)
मेंहदी – बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव (प्रथम), रासायनिकशास्त्र प्रशाळा, कबचौ उमवि, जळगाव (द्वितीय), आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (तृतीय)

गटनिहाय विजेतेपद

संगीत गट – मू.जे. महाविद्यालय, जळगाव

Protected Content