फैजपूर, प्रतिनिधी | दिव्यांग बांधवाचा राखीव पाच टक्के निधी मिळावा अशी मागणी फैजपूर दिव्यांग सेनेच्या वतीने शहराध्यक्ष नितीन महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक सुनंदा बाक्षे मँडम यांनी स्विकारले.
दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन यांच्या सुचनेनुसार फैजपूर दिव्यांग सेनेतर्फे निवेदन देण्यात आले. दिव्यांग विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण सपकाळे यांनी दिव्यांग निधीबाबत संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.. लवकरच मुख्याधिकारी याच्याशी चर्चा करून निधीचे वाटप केले जाईल असे सकारात्मक ऊत्तर दिले. निवेदनात दिव्यांग बांधवांना घरकुल व इतर कल्याणकारी योजना नपाचे माध्यमातून राबविण्यात याव्या व लाभ देण्यात यावा.असेही नमूद करण्यात आले..ज्या नविन दिव्यांग बांधवांना नोंदणी प्रस्ताव दाखल करायचे असतील त्यांनी नपात संबंधित दिव्यांग विभागात नमुना अर्ज भरुन सादर करावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.निवेदन देतांना संघटनेचे उपाध्यक्ष ललित वाघूळदे, जिल्हा संघटक नानाभाऊ मोची,जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, तालुका अध्यक्ष मुन्ना चौधरी ,तालुका सचिव चेतन तळेले , सदस्य युनुस तडवी, अशपाक व शहरातील दिव्यांग बांधव ऊपस्थित होते.