दिल्ली वृत्तसंस्था । दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रातील नेत्यांवरसुद्धा प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, येत्या ८ तारखेला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून ११ तारखेला मतमोजणी होणार आहे. भाजपाचे उमेदवार राजकुमार भाटिया यांच्या प्रचारार्थ जळगावच्या खा.रक्षाताई खडसे यांच्या कार्नर सभा झाल्या.
दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासाठी रक्षाताई खडसे यांनी नुकतेच प्रचाराची सुरवात केली. शुक्रवारी 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वा. आदर्शनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजकुमार भाटिया यांच्या प्रचारार्थ आदर्श नगर येथे त्यांच्या 2 कॉर्नर सभा पार पडल्या. जहांगीर पुरी येथे 1 कॉर्नर सभा घेतली. उमेदवारांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महिला मीटिंगमध्ये त्यांनी महिलांशी संवाद साधला. जनतेला खोटी वचने देणाऱ्या केजरीवाल सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी उपस्थित मतदारांना केले.