कासोदा येथील लिटिल स्कूलमध्ये पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

WhatsApp Image 2020 02 01 at 16.09.15

कासोदा प्रतिनिधी । येथील बालविश्व प्रायमरी व लिटिल व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच विद्यार्थिनी व महिला- पालकांसाठी उमलत्या वयाशी जुळवून जाणे हा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम ही उत्साहात पार पडला.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गाऊन आलेल्या मान्यवर महिलांचे स्वागत केले. त्याप्रसंगी मुख्यध्यापिका सारिका कासार यांनी बोलतांना म्हटले की मुलींच्या जिवनात आईचा वाटा मोलाचा असतो. आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी मुलिंशी मैत्रीणी प्रमाणे वागावे व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे. कार्यक्रमासाठी शाळेचे संचालक अशोक पाटील यांनी मोलाचे योगदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका कासार, माधुरी चौधरी, ललित पाटील, शाळेच्या शिक्षिका व शिक्षेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content