जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या बलिदान दिवसानिमित्ताने दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम येथे राजीव क्रांती अंतर्गत भारत जोडो अभियानाचे युवक काँग्रेसच्या वतीने आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
राजीव क्रांती कार्यक्रमात राष्ट्रीय नेते प्रियांका गांधी , अल्का लांबा , युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत , प्रभारी हरपाल सिंग, विजय सिंग, प्रदीप सिंग, प्रियांका सानप, जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जळगाव महानगरध्यक्ष मुजीब पटेल, रावेर विधानसभा अध्यक्ष फैजन शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की स्व. राजीव गांधी यांचे नाव स्वप्न युवक काँग्रेस पूर्ण करेल. तसेच राजीव क्रांती या अभियानात भारत जोडोचा नारा देत सध्या भारत देशात मोदी सरकार जाती जाती धर्मा धर्मात तेढ निर्माण करून जनतेला तोडण्याचे काम करत आहे. परंतु, युवक काँग्रेस संपूर्ण भारत देशात भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत राजीव क्रांती आणत युवकांना जोडण्याचे काम युवक काँग्रेस करणार आहे
युवक कॉंग्रेस जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद मराठे यांनी यावेळी सांगितले की, स्व. राजीव गांधी यांनी देशभरात जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करून त्याद्वारे हुशार व कर्तबगार युवा पिढी घडविण्याचे काम राजीवजी गांधी यांनी केले. तसेच *वयाची १८ वर्ष पूर्ण असणाऱ्या युवकांना मतदानाचा अधिकार देऊन लोकशाहीच्या निर्णायक प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग करून घेतला. केंद्रीय सत्ता ही फक्त मोजक्या लोकांच्या हातात न राहता सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे या उद्देशाने पंचायत राजची स्थापना करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांना अमर्याद अधिकार देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण केले. जातीयवाद, धर्मवाद, भाषावाद व प्रांतवाद या देशाला तोडणाऱ्या गोष्टींचा त्यांनी कायम विरोध केला. देश अखंडित ठेवण्यासाठी त्यांचे बलिदान युवकांच्या सदैव स्मरणात असायलाच हवे यासाठी भारत जोडो अभियानास प्रारंभ करण्यात आले असल्याचे श्री. मराठे यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1072680466724388