जळगाव प्रतिनिधी । दारूपिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाने वयोवध्दाला मारहाण करून डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना रामेश्वर कॉलनी परिसरातील जवाई गल्ली येथे गुरूवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश बालु गव्हाळे (वय-६१) रा. जवाई गल्ली, रामेश्वर कॉलनी येथे कुटुंबासह राहातात. गुरूवारी ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्याच गल्लीतील खुशाल बाळू मराठे रा. रामेश्वर कॉलनी याने गणेश गव्हाळे यांच्या मुलगी मिना पिंकेज हरदे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. दरम्यान, पैसे न दिल्याने शिवीगाळ केली. याचा जाब गणेश गव्हाळे यांनी विचारला असता खुशाल मराठे याने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच आजूला पडलेला लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गणेश गव्हाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे. ़