मर्डर: कंडारीत तरूणाचे डोके दगडाने ठेचले

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथील ४० वर्षीय तरूणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यात आज सकाळी उघडकीस आली. डोक्यात मोठा दगड टाकून तरूणाची हत्या झाली आहे. घटनास्थळी नशिराबाद पोलीसांनी धाव घेतली आहे.

याबाबत माहिती अशी की, तुषार प्रभाकर सुर्वे (४१) रा. कंडारी ता. भुसावळ आणि रायपुर येथील उपसरपंच वसंत सिताराम धनगर दोघांनी खळ्यात बुधवारी रात्री मद्यप्राशन केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तुषार खळ्यात रखवालीसाठी गेला होता तर वसंत धनगर यांचे वाघुर धरणाजवळ घर आहे. रात्री साडे आठ वाजेपर्यंतच आपण सोबत होतो, असे त्यांनी तपासात सांगितले आहे. नेरी-गाडेगाव रस्त्यावर तुषार यांचे शेत व खळे आहे. त्यानंतर सकाळी तुषारचा मृतदेहच आढळून आला. तुषार हा खळ्यात पलंगावर मयतावस्थेत पडलेल्या असल्याची माहिती प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांनी कुटुंबाला कळविली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे,सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारुळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्नी मनिषा यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार याच्या पश्चात पत्नी मनिषा, मुलगा ओम, वडील प्रभाकर भाऊराव सुर्वे, भाऊ हेमंत असा परिवार आहे.

Protected Content