जळगाव प्रतिनिधी । महामंडलेश्वर स्वामी ब्रह्मांडपुरीजी महाराज यांच्या पुढाकाराने उभारण्यात येणार्या संविधान मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमाला लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, श्रीश्री १००८ महामंडलेश्वर ब्रह्मांडपुरीजी महाराज यांच्या पुढाकाराने दहीवद ता. चाळीसगाव येथे संविधान मंदिर उभारण्यात येत आहे. देशातील हे अशा प्रकारचे पहिले मंदिर असल्याने सर्वांना याबाबत खूप उत्सुकता लागली आहे. या मंदिराचा शिलान्यास ९ एप्रिल २०२० रोजी आयोजित करण्यात आला होता. तथापि, सध्या लॉकडाऊन सुरू असून यात नव्याने वाढत करण्यात आल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी दिली आहे.
दहीवद येथे श्री सिध्ददात्री माँ पितांबरा शक्तीपीठ आणि संविधान मंदिर यांची एकमेकांच्या बाजूला उभारणी करण्यात येणार आहे. या मंदिराच्या कळसावर भगवा आणि तिरंगा हे दोन्ही ध्वज राहणार असून यात दररोज पुजापाठासोबत संविधानाबाबत चर्चा तसेच अन्य कार्यक्रम होणार आहेत. या मंदिराच्या प्रार्थनेची पूजा ही राष्ट्रगीताने होणार आहे. तर वर्षभर या मंदिरात विविध महापुरूषांच्या जयंती व पुण्यतिथी उत्सवांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी दिली आहे. तूर्तास संविधान मंदिराचा शिलान्यास कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असला तरी लॉकडाऊन उठल्यानंतर याचे काम सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००