चाळीसगावात महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण

karate

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील स्व.लोकनायक महिंद्रसिंग तात्या राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळच्या वतीने महिला व मुलींसाठी मोफत तीन दिवसीय कराटे प्रशिक्षण शहरातील पोलीस ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
कराटे प्रशिक्षक छोटू चौधरी यांनी मुलींना कराटे प्रशिक्षनाचे धडे देत मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रत्येक मुलीने डोळे उघडे ठेवून आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आपल्या घरच्या किंवा जवळच्या लोकांजवळ सांगाव्यात. मन मोकळे करावे, त्यामुळे बरेच अनर्थ टळतील, असे मिनाक्षी निकम यांनी बोलतांना सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे यावेळी म्हणाले, कायदा आहे, पोलीस यंत्रणा ही आहेत. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ते आपल्या पर्यंत पोहचतीलच असे नाही म्हणून प्रत्येक मुलीने स्वसंरक्षणाचे धडे घेऊन त्याचा वापर केला पाहिजे.

जिजाऊ समिती अध्यक्षा सोनल साळुंखे यांनी सांगितले की, महिलांचे शिक्षणाचे कार्यक्षेत्र वाढले, परंतु व्यक्तीगत पातळीवर ती अनेक अन्याय, अत्याचार ती सहन करत आहे. त्याला योग्य वेळी वाचा फोडण गरजेचं आहे. जमलेल्या मुलींमधून कु. सिद्धी राजेंद्र पाटील हिने आपले मनोगत व्यक्त करताना मुलींना कशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे व तिच्या समाजाकडुन काय अपेक्षा आहेत. हे तिने स्वतः रचलेल्या काव्यातून वास्तव सर्वांसमोर परखड पणे मांडले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन चाळीसगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष रोही व रावसाहेब कीर्तिकर केले. शहरातील उपस्थित मान्यवरांमध्ये अध्यक्षा सुचित्रा राजपूत, गटशिक्षणाधिकारी भोई, मिनाक्षी निकम, शीघ्रकवी रमेश पोतदार, जिजाऊ समिती अध्यक्षा सोनल साळुंखे, सुनीता घाटे, आशा शिरसाठ, माजी नगरसेविका स्मिता पाटील, छाया राजपूत, मनोहर चौधरी, सोनाली लोखंडे, अरुण जगताप, विनायक ठाकूर, टोनू राजपूत, प्रवीण राजपूत, धर्मा बछे, सुजित पाटील, सुवर्णा पाटील, योगिता राजपूत, शारदा आत्रे, सुवर्णा शेलार, मनीषा बोरसे, रोहिणी महाशब्दे, अग्रवाल मॅडम, नेवे मॅडम, मनीषा देशमुख, सविता अमृतकार, लोखंडे मॅडम, प्रताप भोसले, पांडुरंग राजपूत, योगेश सोनवणे, सोनाली सोनवणे, सविता सोनवणे, प्रवीण राजपूत, दीपक पाटील, चौधरी अर्चना पाटील, सरपंच वरखडे, पिंकी राजपूत, शांता पाटील, प्रतिभा पाटील, मिनू पवार, मनोहर चौधरी, ऋषीकेश पाटील, सनी शेलार आणि मोनू राजपूत यांची उपस्थिती होती.

150 मुलींचा सहभाग
याप्रसंगी सूत्रसंचालन हे सविता राजपूत यांनी केले. 3 दिवसांच्या या प्रशिक्षणाचा लाभ शहरातील 150 मुली घेत असून त्यांना प्रशिक्षण देणारे छोटू चौधरी व हिरकणी मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे शहरातून स्वागत होताना दिसत आहे.

Protected Content