चाळीसगाव शहरातून २८ वर्षीय तरुण बेपता!

चाळीसगाव,प्रतिनिधी | शेगावच्या दर्शनाला जाऊन येतो असे सांगून गेलेला तरुण बेपता झाल्याची घटना शहरात उघडकीला आली असून याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील पुंशी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे राहणारा रविराज सुनील शिंपी (वय-२८) रा. धुळे रोड, चाळीसगाव हा शेगावला दर्शन करून येतो असे घरच्यांना बुधवार रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारस सांगून निघून गेला. मात्र तो घरी न परतल्यामुळे घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु तो मिळून न आल्यामुळे हरवल्याची खात्री झाल्यामुळे त्याचा भाऊ हर्षल सुनील शिंपी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

Protected Content