दहिगाव येथे शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची स्वब तपासणी

यावल प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील दहिगाव येथे कोवीड तपासणी शिबीरात शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यासाठी सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शिबीराचे आयोजन केले आहे.

तालुक्यातील दहिगाव येथे पंचायत समितीचे गटविकासअधिकारी डॉ. निलेश पाटील, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज तडवी, सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीगाव येथे आयोजीत शिबिरात ५४ शासकीय कर्मचाऱ्यांची कोविड-19 तपासणीसाठी आरटीपीसीआर स्वॅब घेऊन अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले.

जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी जिल्ह्यातील तालुक्यासह संपूर्ण सर्व गावामध्ये प्रत्येक विभागातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे कोविडचे स्वॅब तपासणी करण्याचे १४ ते २४ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत नियोजन करण्याचे आदेश देण्यात दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील गावात स्वॅब तपासणी शिबिराचे नियोजन सावखेडा सिमच्या प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व आरोग्य सहाय्यक एल.जी. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. त्यानुसार आज दहीगाव येथील आदर्श विद्यालयातील.मुख्याध्यापक व शिक्षक त्याचप्रमाणे जिल्हा परिषदची मराठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा सर्व ५४ शासकीयकर्मचाऱ्यांचे आर टी पी सी आर स्वब घेण्यात आले. स्वब डॉ. गौरव भोईटे यांनी घेतले तर त्यांना संजय तडवी, बालाजी कोरडे, राजेंद्र बारी, शिवप्रताप घारू, अनिता नेहते सर्व आशा सेविका यांनी सहकार्य केले.

Protected Content