दहशतवाद्यांबरोबर चकमकीत तीन जवान शहीद

 

श्रीनगर : वृत्तसंस्था । उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये एलओसी जवळ दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या अगोदर जवानांकडून एलओसीवरील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला व दोन घुसखोरांचा खात्मा देखील करण्यात आला.

शनिवारी रात्री माछिल सेक्टरमध्ये एलओसीवर संशयीत हालचाली आढळून आल्या होत्या. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यावेळी जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला व घटनास्थळावरून एक एके-47 रायफल आणि दोन बॅग हस्तगत करण्यात आल्या होत्या.

माछिल सेक्टरमधील कारवाईदरम्यान कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे शहीद झाले. जवानांकडून परिसरात अद्यापही शोधमोहीम राबवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Protected Content