दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आगामी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमिवर दहशतवादी मोठ्या संख्येने भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आज लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी दिली आहे. ते आर्मी डे परेड कार्यक्रमात बोलत होते.

पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग घेतलेले तीनशे ते चारशे दहशतवादी भारतीय हद्दीत शिरकाव करण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी आर्मी डे परेड कार्यक्रमात बोलताना दिली.

शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वारंवार होत असलेल्या घटना लक्षात घेतल्या तर पाकचा नापाक इरादा दिसून येतो, असे सांगतानाच नरवणे यांनी गतवर्षी प्रत्यक्ष सीमारेषा आणि विविध ऑपरेशन्समध्ये दोनशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले असल्याची माहिती दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये ४४ टक्क्याने वाढ असल्याचेही नरवणे यांनी नमूद केले.

Protected Content