नावरे येथील सखी महिला केंद्राने वेधले लक्ष

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नावरे येथे उभारण्यात आलेल्या सखी महिला मतदान केंद्रावर सर्व महिलांची नियुक्ती करण्यात आली असून या केंद्राने मतदारांचे लक्ष आकृष्ट करून घेतल्याचे दिसून आले आहे.

यावल तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नावरे ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुकी करिता महीलांनाच या ठीकाणी मतदान करण्यात येईल यासाठी प्रशासनाच्या पुढाकाराने सखी महीला केंद्राची जिल्हा परिषद शाळेत उभारणी करण्यात आली आहे. या केन्द्रावर मतदान केन्द्राध्यक्ष म्हणुन पुष्पा विजय आहिराव, केन्द्र अधिकारी कल्पना देविदास माळी व हसीना गंभीर तडवी तर मतदान केन्द्र शिपाई फातेमा चंद्रशेखर तडवी, पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी राजश्री चंपालाल मौर्य यांची नेमणुक करण्यात आली आहे.

या केन्द्रास शिरपुर विभागाचे प्रांत अधिकारी व निवडणुक निरिक्षक व्ही. व्ही. बादल यांच्यासह यावल तालुका निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार, पुरवठा निरिक्षक अंकीता वाघमुळे यांच्यासह आदी प्रशासकीय पातळीवरील अधिकारी यांनी या सखी महीला मतदान केन्द्राची पाहणी करून या आगळ्यावेगळ्या प्रयोगा बद्दल माजी सरपंच समाधान पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले आहे.

Protected Content