Home क्राईम तापी नदीत उडी घेतलेल्या तरूणाचा मृतदेह आढळला !

तापी नदीत उडी घेतलेल्या तरूणाचा मृतदेह आढळला !

0
90

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूणाने तीन दिवसांपुर्वी तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या तरूणाचा अंजाळे शिवारातील मोर नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख अय्युब शेख गयास (वय-३३) रा. किनगाव ता.यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अय्युब शेख गयास हा परिवारासह वास्तव्याला होता. तीन ऑगस्ट रोजी संतापाच्या भरात त्याने दुपारी २ वाजेच्या सुमारास दुचाकी तापी नदीच्या काठावर उभी करून तापी नदीच्या पुलावरून उडी घेवून आत्महत्या केली. असे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले होते. त्यानुसार पोलीसांनी पोहणाऱ्यांच्या पदतीने मृतदेह शोधकार्य सुरू केले. परंतू पावसामुळे नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने शोध कार्यात अनेक अडचणी येत होत्या. रविवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी वाजेच्या सुमारास अंजाळे शिवारातील मोर नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला.  मयत तरूणााच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी, एक भाऊ, चार बहीणी अशा परिवार आहे.  शेख अय्युब हा गावात पानटपरीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. अत्यंत चांगल्या व मनमिळावु स्वभावाचा असल्याने त्याच्या अशा दुदैवी मृत्युने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound