घरगुती गॅसचा काळाबाजार; दोन जणांवर गुन्हे दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्या दोन जणांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत घरगुतीसाठी लागणारे गॅस सिलेंडर, गॅस भरणारे कॉप्रेसर, वजन काटा आदी असा एकुण १ लाख रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रविवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शहरातील बळीराम पेठ परिसरात अवैधरित्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये भरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार बळीराम पेठ येथील दुर्गादेवी मंदीरासमोरील एका टपरीवर आणि त्याच परिसरातील मराठी शाळा क्रमांक १७ जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता छापा टाकला. यात संशयित आरोपी फारूख रौफ खाटीक (वय-२८) रा. न्यू फेडरेशन, पिंप्राळा, जळगाव आणि शाकीब खान सलीम खान (वय-३५) रा. काट्या फाईल शनीपेठ, जळगाव हे दोघे आपापल्या दुकानात अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करून रिक्षात व इतर वाहनात भरत असतांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून घरगुती गॅस सिलेंडर, वजन काटा, ईलक्टीक पंप सोडलेले कॉम्प्रेसर व इतर साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार करीत आहे.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सपोनि निलेश राजपूत, पोहेकॉ अक्रम शेख, किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, प्रितम पाटील यांनी केली.

Protected Content