गॅबरोने (बोट्सवाना) : वृत्तसंस्था । दक्षिण आफ्रिकन देश बोट्सवानातील खाणीमध्ये ३७८ कॅरेटचा पांढरा हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत ११० कोटी रुपयांच्या घरात आहे. कॅनडियन संशोधकांनी हा हिरा खाणीतून शोधून काढला. हा सर्वोच्च गुणवत्ता असलेला हिरा मानला जातो.
३७८ कॅरेटचा हा शानदार हिरा या वर्षातील ३०० कॅरेटहून अधिक प्रकारातील दुसरा हिरा आहे. ल्युसारा कंपनीचे सीईओ ईरा थॉमस यांनी याबाबत अधिकृत निवेदन जारी केलं.
बोट्सवानातील कारोव खाणीत उच्च गुणवत्तेच्या हिऱ्याची क्षमता अधिक उजळून निघाल्याचं म्हटलं जात आहे. “३७८ कॅरेट किंवा ३४१ कॅरेटसारख्या मोठ्या हिऱ्यांमुळे कारोवमध्ये भूमिगत संपत्ती आणि वित्त निर्मितीच्या संधी असल्याचं अधोरेखित होतं” असं थॉमस यांनी सांगितलं.
किमान १३ वर्षांपर्यंत उत्खननाचं काम केलं जाईल. कारोवच्या खाणीतून बाहेर काढलेला हा हिरा २०१५ मध्ये सापडलेल्या २०० कॅरेटच्या हिऱ्यापेक्षा अधिक मजबुतीचा ५५ वा हिरा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हिऱ्याचे कॅरेट अधिक, तशी त्याची किंमतही अधिक असते.
पाकिस्तानने खाणीच्या उत्खननासाठी ज्या कंपन्यांशी करार केला होता, ते करार लोभापाई त्यांनी पुढे रद्द केले. पाकिस्तानला त्यांच्या या चुकीचं फळ भोगावं लागणार आहे. कारण वेस्ट इंडिजच्या एका कोर्टाने पाकिस्तान विरोधात मोठा निर्णय जाहीर केला आहे. आर्थिक संकटात होरपळणाऱ्या पाकिस्तानाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. वेस्ट इंडिजच्या कोर्टाने पाकिस्तान सरकारला तब्बल ६ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ४४ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील रेको डिक ही खाण जगातील पाचवी सर्वात मोठी सोने आणि तांब्याची खाण आहे. सोन्याची खाण अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळ आहे. या खाणीतून दरवर्षी दोन लाख टन कॉपर आणि अडीच लाख औंस सोनं काढलं जातं. या खाणीतून पाकिस्तानला दरवर्षी ३ . ६४ अब्ज डॉलरचा फायदा होतो. विशेष म्हणजे पुढच्या ५५ वर्षांपर्यंत या खाणीतून सोनं आणि तांबे काढले जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.