थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा : चंद्रकांत डांगे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा. वीज देयक थकबाकी वसुलीमध्ये व ग्राहक सेवेत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिला.

 

जळगाव मंडळातील अभियंता व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधिक्षक अभियंता फारूख शेख उपस्थित होते.

 

ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल योग्य व वेळेत देण्यासाठी मीटर रीडिंग एजन्सी नेमल्या आहेत. या एजन्सींना मीटर रिडींग घेताना फोटोंचा दर्जा सुधारणे तसेच अचूक कामकाज करण्यास सांगितले आहे. याकडे उपविभागीय अभियंते व कार्यकारी अभियंते यांनीसुद्धा लक्ष द्यावे. घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक तसेच पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके वेळेत भरण्यासाठी अभियंत्यांनी पाठपुरावा करावा. वीज देयक न भरल्याने  वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या वीज जोडणीची तपासणी करण्याचे निर्देशही डांगे यांनी दिले. या बैठकीस जळगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content