वाशिंग मशीनसाठी घेण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील मासूमवाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला तिने वाशिंग मशीन घेण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत या कारणावरुन तिचा मारहाण करुन छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मासुमवाडी येथील रहिवासी नाझमिन जमीर पटेल वय २६ यांचा गुजरात राज्यातील उधना येथील जमील मजीद पटेल यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर घरातील सामान तसेच रेमंडच्या कपडे आणावेत या कारणावरुन नाझमिन हिस तिच्या पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर वाशिंग मशीनसाठी माहेरुन नाझमिन हिने १७ हजार रुपये आणावेत या कारणावरुनही पतीने लाकडी दांडक्याने मारहाण केली. अशा पध्दतीने पतीसह सासरे व सासू यांनी वेळावेळी नाझमिन हिचा माहेरी तसेच सासरी शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून नाझमीन पटेल ह्या माहेरी निघून आल्या. याबाबत नाझमिन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवारी तिचे पती जमीन मजीद पटेल, सासरे मजीद सुभान पटेल, सासू फरजाना मजीद पटेल तिघे रा. सुमन सिंधी सोसायटी, उधना, सुरत, गुजराज या तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.

 

Protected Content