आंबीलहोळ येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यातील आंबील होळ येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी २२ जुलै रोजी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात जामनेर तालुक्यातील आंबील होळ येथील जिल्हा परिषद शाळेत व्हीजेएनटी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  अरविंद चितोडिया यांच्यावतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड, बंगालीसिंह चितोडिया, विलास राजपूत, अरविंद चितोडिया, जीडीसीसी बँक संचालक नाना राजमल पाटील, संदीप हिवराळे, हिम्मत राजपूत, देलसिंग नाईक, नटवर चव्हाण, अपरसिंग चव्हाण, देविदास चव्हाण, दीपक चव्हाण, ज्ञानदास चव्हाण, शत्रुघन चव्हाण, राजू चव्हाण यांच्यासह शाळा समिती अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.

Protected Content