जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत मयूर कॉलनीतील महिलांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देऊन दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
निवेदनाचा आशय असा की, रविवार २५ जुलै रोजी रात्री उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या घराजवळ येऊन काही लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर बंदुकीच्या गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला केला. आम्ही काही महिला पुरुष व लहान मुले घराबाहेर असतांना ही सर्व घटना अचानक घडल्याने हा सर्व प्रकार पाहून घाबरलो आहोत. आमच्या समोर काही मुल कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करत असताना आम्हाला आता स्वतः व आमचे परिवार असुरक्षित असल्याचे दिसत आहे. कारण आमचे प्रतिनिधी नगरसेवक जर असुरक्षित असतील तर साहजिकच असा प्रश्न उद्भवतो. घडलेल्या सर्व प्रकारामागे जे कोणी दोषी असतील अशा सर्व कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.निवेदनावर मीना भोसले रमल बाई राजपूत सुनिता पाटील अरूणाबाई परदेशी कमलाबाई बारी प्रवीण जाकीर खान सरला रवींद्र पाटील योगिता राजेंद्र शिंपी निर्मला भगवान शिंपी रंजना विकास वराडे पारी आशाबाई मिस्तरी अनिता बडगुजर वंदना मिस्तरी आदींच्या स्वाक्षरी आहे.