तोतया पोलीसांकडून शेतकऱ्याची एक लाखात फसवणूक

पहुर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळ पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात देान जणांनी वृध्द शेतकऱ्याजवळील जबरी १ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे कौतिक विठ्ठल ठाकरे (वय-७२) हे वयोवृत्त आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतीचे पीक कर्जाचे १ लाख रुपये पिशवीत ठेवून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांचा रस्ता अडवून आपण पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर कौतिक ठाकरे यांच्याजवळील पिशवीतील एक लाख रुपयांची रोकड घेऊन घेऊन पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर वयोवृद्ध शेतकरी यांनी पहूर  पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २७ मे रोजी रात्री ११ वाजता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहे.

Protected Content