तृणमुलच्या आजी-माजी खासदारांसह ११ आमदार भाजपमध्ये

 

कोलकाता । निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबर धक्का बसला असून आज गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाच्या आजी-माजी खासदारांसह तब्बल ११ आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे..

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी येथील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय. भारतीय जनता पक्षाने येथे आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून भाजपकडून पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसला एकामागून-एक जोरदार धक्के बसत आहेत.

अशातच आज बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महाभरती पार पडली. आज तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला.

यावेळी बोलताना अमित शाह यांनी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवत निवडणुका येतील तेव्हा ममता बॅनर्जी पक्षात एकट्याच उरतील असं वक्तव्य केलं.

Protected Content