तालिबानवर पाकिस्तानी लष्कराचा वरदहस्त; अफगाणिस्तानचा आरोप

 

कंदाहार  : वृत्तसंस्था । अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह साहेल यांनी पाकिस्तानी वायु सेनेने तालिबानला पाठिंबा दिला असल्याचा आरोप केला आहे. तालिबानच्या डोक्यावर पाकिस्तानी लष्कराचा वरदहस्त असल्याचं त्यांनी सांगितलं

 

अमरुल्लाह साहेल यांनी ट्विटद्वारे सांगितले की, पाकिस्तानी वायु सेनेने अफगाणिस्ताची सेना व वायु सेनेला अधिकृतरित्या इशारा दिला आहे की, स्पिन बोल्डक क्षेत्रातून तालिबानला हटवण्याचा कुठल्याही प्रयत्नाविरोधात प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानची वायु सेना आता तालिबानच्या काही भागात हवाई मदत पुरवत आहे.

 

 

स्पिन बोल्डकला पाकिस्तानात चमन बॉर्डर नावाने ओळखलं जातं . या बॉर्डरवर अशातच तालिबानने अफगाणिस्तानच्या सैन्याला पळवून ताबा मिळवला आहे. अमरुल्लाह साहेल यांनी पाकिस्तानच्या वायु दलावर केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध केलेले नाही.

 

अमेरिकन सैन्यानं परतीचा रस्ता धरताच अफगाणिस्तानात तालिबानने डोकं वर काढलं असून, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला. या दाव्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती पुन्हा बिघडण्याची चिन्हं दिसत आहे. यातच अफगाणिस्तानातील कंदहारमध्ये असलेला भारतीय दूतावास बंद करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं.

 

Protected Content