तांबापूरातील रेशनदुकानाचा परवाना रद्द; जिल्हापुरवठा विभागाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । आपत्तीच्या काळात लाभार्थ्यांना धान्य वाटप न करणाऱ्या शहरातील तांबापूरा भागातील रेशन दुकानाचा परवाना आज जिल्हा पुरवठा अधिकारी रद्द करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, तांबापूरा परीसरातील वार्ड क्रमांक ३८/२ मधील कार्याध्यक्ष ग्रामोद्यो मंडळ जोडलेले स्त्रियांचे ग्राहक मंडळ स्वस्त धान्य दुकान क्रमांक ६९ या रेशनदुकानाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी आल्याने येथील तहसीलदार वैशाली हिंगे यांनी ५ व ६ एप्रिल रोजी एकुण ६ फेऱ्या मारल्या होता. प्रत्येक फेरीच्या वेळी दुकान त्यांना बंद दिसुन आले. तसेच शासनाच्या आदेशान्वये सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते १० पर्यंत लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे आवश्यक असतांना देखील स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना शासकीय धान्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर तहसीलदार यांनी स्वस्त धान्य दुकान परवानाधारक यांना अनेकदा सुचना देवूनही शासकिय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवाना तातडीने रद्द करावा आणि हे रेशन दुकान तांबापुरा येथील समाजसेवक मसीन पटेल यांना चालवायला द्यावे असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला होता. त्यानुसार आज स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आले आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांना धान्य घेण्यासाठी वरील व्यक्तीशी भेटून धान्य घ्यावे असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

*वेबसाईट :* https://livetrends.news

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/livetrendsnews01

*व्हाटसअ‍ॅप क्रमांक :* ९३७०४०३२००

Protected Content