जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील तांबापुरा भागात सतत होणाऱ्या दंगली व या अनुषंगाने होणाऱ्या पोलिस कार्यवाही यामुळे या परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या परिसरात अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी २४ तास पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, तांबापूर भागात आम्ही हात मजुरी करणाऱ्या रहिवाशाची मुले आहोत. आमच्या शैक्षणिक खर्च आमचे आई वडील हात मजूरी करून पूर्ण करत आहेत. याची आम्हला जाणीव असून आम्ही आमच्या ध्यासासाठी स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांचा अभ्यास करीत आहोत. आर्थिक परिस्थिती नाजूका असल्याने आम्ही त्या भागात राहतो, यामध्ये आमची काहीही चूक नाही. या भागातील होणाऱ्या सतत दंगली प्रकरणी आमची आभ्यासाची गैरसोय होत असते. ज्या दिवशी दंगल घडते त्या दिवशी आमचा त्यात कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नसतो. आमच्यावर चुकून पोलीस कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागातील अवैध धंदे बंद करन २४ तास बंदोबस्त देण्यात यावा जेणेकरून त्या भागातील गुन्हेगारी थांबेल व दंगली होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदनावर महेश कोळी, संभाजी हटकर, प्रवीण चोरमले, संदीप काळे, भूषण हटकर, सूनील पिसे, संदीप हटकर, योगेश हटकर, शुभम हटकर, दिनेश हटकर आदींची स्वाक्षरी आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1008020973250612