तांदुळवाडी येथील तरुणाची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील तांदुळवाडी येथील मयूर देशमुखने बिकट परिस्थितीवर मात करून राबराब कष्ट करून आईच्या संस्कारातून तांदुळवाडी या गावातील नवतरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत थेट पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली.

याबाबत माहिती अशी की, तांदुळवाडी येथील रहिवाशी लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने घरातील परिस्थिती अत्यंत हालाकीची असून वडिलांची सावली हरपलेला नवतरुण व आईच्या सुसंस्कारातून व परिस्थितीवर मात करून तांदुळवाडी या गावातील आदर्श शाळेत २००८ मध्ये शिक्षण घेऊन १० वीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन मनात एकच ध्यास धरून की पुढील शिक्षणास औरंगाबाद स्थान बद्ध झाले.

मनात एकच खंत की, वडिलांचे छत्र नसून कै. तेजपाल कल्याणराव देशमुख हे तांदुळवाडी येथील रहिवासी असतांना त्यांचे चिरंजीव मयूर तेजपाल देशमुख यांनी अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून पुढील शिक्षण औरंगाबाद येथे केले. लहानपणी वडिलांचे निधन झाल्याने आई व घरातील मोठी व्यक्ती असल्याने घरातील जबाबदारी सर्व डोक्यावर धरून खाजकी कंपनीत आईसोबत काम करून आई जयश्री देशमुख यांनी आपल्या मुलांवर आपल्या गावचे व वडिलांचे नाव लौकिक करू लहानपणापासून जिद्द, चिकाटी, प्रयत्न, कष्टमय जीवन जगून अभियांत्रिकी ची पदवी मिळवली सुरवातीला त्यानंतर काही वर्षे खाजगी कंपनीत काम करून मनात एकच द्यास धरून अधिकारीच बनण्याचे स्वप्न उरासी असल्याने लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत थेट पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे.

तरी या निकालानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. व आईच्या मेहनतीचे फळ मिळून या १४९५ लोकसंख्या असलेल्या गावात कमी वयात पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याने मित्र परिवार, शाळेतील शिक्षक वर्ग, नातलग, व जेष्ठ कार्यकर्ते यांनी मयूर देशमुख व सुसंस्कार शिकवणाऱ्या आईचे गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक झाल्याने आनंद होत आहे. आईचा आशीर्वाद व सुसंस्कार नेहमी माझ्या पाठीशी असून मी पुढील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होणारच…हे माझ्या आईचे स्वप्न व गावाचे नाव लौकिक करणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक मयुर तेजपाल देशमुख यांनी सवांद साधतांना सांगितले.

Protected Content