धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तहसिल कार्यालय, धरणगाव येथे “राष्ट्रीय ग्राहक दिवस” चे आज आयोजन करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सी. बी. देवराज, नायब तहसिलदार (निवडणूक) तहसिल कार्यालय धरणगाव, प्रमुख पाहुणे शांताराम बडगुजर, जिल्हा संघटक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जळगाव, नुरुल शेख, पुरवठा निरीक्षक, चंद्रशेखर पाटील तसेच, धरणगाव तालुक्यातील सुजाण नागरिक, स्वस्त धान्य दुकानदार राजू ओस्तवाल, अमृत पाटील, अमोल पाटील, सुधाकर पाटील, गणेश पाटील, लखु भाऊ, ज्ञानेश्वर पाटील, धीरज पाटील हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बडगुजर यांनी सर्व उपस्थितांना ग्राहक दिनाबाबतची पार्श्वभूमी कथन करुन ग्राहकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. ग्राहक हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा राजा असून त्याचेवर संपूर्ण अर्थचक्र हे गतिमान आहे. ग्राहकाचे हक्क व त्यांचे संरक्षण होणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी मार्गदर्शनात प्रतिपादन केले. देवराज, नायब तहसिलदार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात ग्राहकाची फसवणूक न होण्यासाठी त्यांनी घ्यावयाची खबरदारीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हसकर, महसूल सहायक, तहसिल कार्यालय धरणगाव यांनी केले.