अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालयात भाविकांची अलोट गर्दी

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज आंगरिका चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र पद्मालय येथे सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली असून सकाळी पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली.

निसर्गरम्य परिसरात असलेले सुंदर अशा डोगरा माथी व तलावा काठी वसलेले असे डाव्या, उजव्या सोंडेचे दोन स्वयंभू गणेशजी एकाच सिंहासनावर विराजमान असलेले जागृत देवस्थान आहे. रत्नापासून बनलेल्या आशा आकर्षक गणेश मूर्तींचे दर्शन होताच भाविक मंत्र मुग्ध होतात. या ठिकाणी भाविकांची वर्दळ वर्षभर सुरूच असते. पद्मालय येथील श्रींचे हे मंदीर भारतातील साडेतीन पिठांपैकी अर्धे पीठ मानले जाते. हे मंदिर जवळपास ५०० वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज आहे. मंदीराच्या कळसाचे लाबूनच दर्शन घडते. अंगारकी चतुर्थी निमित्त सुमारे ७५ हजार भक्तांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. अमळनेरचे केशवराव पुराणीक यांनी अभिषेक पूजा केली पहाटे ५ वाजे पासून मंदिर उघडण्यात आले.

 

Protected Content