डॉ.उल्हास पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे कृषी शिक्षण दिन उत्साहात

जळगाव, प्रतिनिधी | डॉ.उल्हास पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्यावतीने कृषी शिक्षण दिनाचे औचित्य साधून डॉ.उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळ येथे विद्यार्थी जनजागरण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

भारताचे पहिले राष्ट्रपती तथा पहिले केंद्रिय कृषीमंत्री भारतरत्न डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्‍त ३ डिसेंबर हा दिवस कृषी शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने कृषी शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील कृषी विभागाचे संचालक डॉ. ए. पी. चौधरी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ स्कूलच्या प्राचार्य अनघा पाटील ह्या होत्या. याप्रसंगी प्रा.व्ही.पी. नाफडे यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण दिनाचे महत्व तसेच विविध कृषी संलग्न अभ्यासक्रमांची महिती व त्यातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. ए. पी. चौधरी यांनी कृषी क्षेत्रातील विस्तार व भविष्यातील संधी या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा. आर. जे. सैंदाणे, प्रा. व्ही. पी. धांडे उपस्थीत होते.

Protected Content