जळगावात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; सात जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधी कॉलनी परीसरात खाद्य पदार्थ विक्री करतांना सुखनंदन कपुरचंद अहेरवाल (वय-२६) रा.सिंधी कॉलनी, मनोहर गोपीचंद कुकरेजा (वय-५२) रा. सिंधी कॉलनी हे दोघे आढळून आले तर बाबा कुलर दुकानावर दुकानदार विजय सदानंद लुल्ला (वय-६१) रा. सिंधी कॉलनी याने दुकानावर पाच पेक्षा अधिक जण एकत्र आल्याप्रकरणी, तर शेख शेरू शेख करीत (वय-३६) रा.खदान रोड, बिलाल चौक, शेख आरीफ शेख करीम (वय-३५) रा. मेहरूण रोड, मच्छी बाजार जवळ, तांबापूरा, चिराग शेख रोशन (वय-३०) रा. नवा तांबापूरा, सलमान शकील पटेल (वय-२३) रा. व्यास मेडीकल, मेहरूण रोड या चौघांनी तोंडाला मास्क न लावणे, असे विविध प्रकाराच्या गुन्ह्यातील सात जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content