सीआरपीएफ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण ; दिल्लीतील मुख्यालय सील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीमधील सीआरपीएफ हेडक्वार्टरमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्यामुळे मुख्यालय सील करण्यात आले आहे.

 

एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर रविवारी तातडीने कार्यालय सील करण्यात आले. त्यानंतर ४० वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे कोरोनाग्रस्त अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. तर संपूर्ण इमारत सॅनिटाईझ केल्याशिवाय ही इमारत सुरु केली जाणार नाहीय. दरम्यान, देशात आतापर्यंत सीआरपीएफचे १३६ आणि बीएसएफचे १७ जवान कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

Protected Content