गांधीनगर (वृत्तसंस्था) जर भाजपा चिनी सामानाचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे,अशी मागणी गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत केली आहे.
अहमदाबाद मिररशी बोलताना छोटू वसावा म्हणाले की, चीन आपला शत्रू आहे. जर भाजपाचा चीनला खरंच विरोध असेल तर पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटी हटावावा, कारण तो मेड इन चायना आहे. चीनचा विरोध करायचा असेल तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या जमिनी घेण्यासाठी सरकार बळजबरी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. गुजरात सरकार विकासाच्या नावाखाली केवाडियामधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप छोटू वसावा यांनी केला.