चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मकर संक्रांतीच्या दिवशीच आज सायंकाळी सातच्या सुमारास शहरात एका तरूणाचा खून झाल्याची थरारक घटना उघडकीला आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पवारवाडीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरूणाचा आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पोतदार शाळेजवळ खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान दिनेश पवार (भावडू) (वय ३५) रा. पवार वाडी, चाळीसगाव असे मयत तरूणाचा नाव असल्याचे कळते आहे. मात्र या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ह्या खूनचा कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस याची कसून चौकशी सुरू केली आहे. तत्पूर्वी एकीकडे मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत असताना ह्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.