जळगाव : प्रतिनिधी । शहरातील हरी विठ्ठल नगरातील रहिवाशी असलेल्या तरुणाने आज रेल्वेखाली पडून आत्महत्या केली या प्रयत्नात दोन्ही पाय कापले गेल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
हरी विठ्ठल नगरातील लक्ष्मण दौलत महाजन ( वय ४० ) असे या तरुणाचे नाव आहे तो भाजीपाला आणि वडापाव विक्रीचा व्यवसाय करीत होता कर्जबाजारी झाल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने आत्म्हत्या केल्याचे सांगण्यात आले आत्महत्येच्या प्रयत्नात भरधाव रेल्वे जवळ आल्यावर त्याने लांब होण्याचा प्रयत्न केला मात्र या धडपडीत त्याचे पाय कापले गेले असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले . रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात पत्नी व २ मुले असा परिवार आहे