ढेकु खुर्द येथे राज्यव्यापी ई- पीक पाहणी डेमो अॅपचे प्रशिक्षण

अमळनेर प्रतिनिधी ।  नगाव मंडळ भागातील ढेकु खुर्द येथे राज्यव्यापी ई- पीक पाहणी डेमो अॅप प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

 

उपविभागीय अधिकारी  सीमा अहिरे तसेच तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनात ई- पीक पाहणी डेमो अॅप प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  नगावं भाग  मंडळ अधिकारी पी. एस. पाटील, तसेच नगावं मंडळातील सर्व तलाठी  स्वप्नील कुलकर्णी,  आशिष पारधे, हर्षवर्धन मोरे, महेश अहिरराव, राधिका गरुड, प्रथमेश पिंगळे तसेच कोतवाल पिरन गजरे यानी परिश्रम घेतले.  या प्रशिक्षण कार्यक्रमास समस्त ढेकु खुर्द व ढेकु बु आणि ढेकु तांडा या गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Protected Content