नांद्रा येथे माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण : विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती

पाचोरा प्रतिनिधी ।  तालुक्यातील  नांद्रा येथील क्रिएटिव्ह  स्कूलमध्ये ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण  जेष्ठ माजी सैनिक जगन्नाथ पाटील (फौजी) यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

 

ध्वजारोहणप्रसंगी विद्यार्थ्यांना ऑनलाईन चालू असलेल्या शिक्षणाबरोबरच यावर्षी ऑनलाईन ध्वजारोहणाला ही आपली उपस्थिती नोंदविली. याबरोबरच ग्रामपंचायत नांद्रा येथील ध्वजारोहण सरपंच आशा तावडे यांच्या हस्ते, जि. प. प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहन ग्रा. पं. सदस्या कल्पना तावडे, तलाठी कार्यालय येथील ध्वजारोहण हिरालाल सूर्यवंशी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ध्वजारोहण  जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, माध्यमिक विद्यालय येथे डॉ. वाय. जी. पाटील यासर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी क्रिएटिव्ह स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या स्तुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून  व  त्यांच्यात देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व देश प्रेम वाढीस लागून त्यांना अभिव्यक्त होता यावे म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ऑनलाइन लाईव्ह सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये वकृत्व स्पर्धा, देशभक्ती गायन, फॅन्सी ड्रेस, नृत्य अशा स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना या नाविन्यपूर्ण ऑनलाइन शिक्षणाबरोबरच ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या विविध गुण कौशल्य दाखवण्याचं व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण होऊन त्यांनी  आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अरुंधती राजेंद्र पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक संस्थाध्यक्ष प्रा. यशवंत पवार यांनी केले. याप्रसंगी शिक्षिका  मनिषा बडगुजर, उज्वला महाले, पूजा सोनजे, हिना पाटील, शिपाई सुभाष पिंपळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती  ग्रामपंचायत कमिटीचे विनोद तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष तावडे, किशोर खैरनार, सखाराम पाटील, संजय पाटील, ओम पवार, संदीप सूर्यवंशी, हिरालाल सूर्यवंशी, शरद बोरसे (फौजी), गजानन ठाकुरसर ग्रामसेविका श्रीमती सपकाळे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे आभार नम्रता पवार यांनी मानले.

Protected Content